मिलिंद मुळीक यांनी केवळ घरात रोज दिसणार्या वस्तू, घटक इ. गोष्टी चितारून @होम अशी चित्रमालिका तयार केली आहे. त्याचं स्वतंत्र प्रदर्शनही झालं असून त्यातली निवडक चित्रं या पुस्तकात घेण्यात आली आहेत. तसंच सध्याच्या तरुणांच्या बोलीभाषेत मुळीक संवाद साधतात. कधी चित्रांविषयीच्या आठवणी सांगतात, कधी ते चित्र काढतानाची मनःस्थिती तर कधी चित्र काढण्याविषयीचं चिंतन प्रकट करतात. एके ठिकाणी ते म्हणतात, मी पुन्हा तेच ते विषय का चितारतो?... तेच सेटिंग... प्रकाशाचा परिणामही तोच... फक्त रंगसंगती आणि रंगांचे फटकारे जरा वेगळे. फरकांपेक्षा साध्यर्मच जास्त.
विषय साधे आणि रोजचेच असले तरी मुळीकांच्या कुंचल्याचा स्पर्श झाल्यावर कलात्मक बनतात.
Thanks for subscribing!
This email has been registered!