१८१८ ते १९५० या कालखंडातील मराठी नियतकालिकांतून वेळोवेळी जे लेखन झालं त्यातून कलासमीक्षेच्या परंपरेला सुरुवात झाली. देशातील पारतंत्र्याच्या काळात आणि विशिष्ट सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय पर्यावरणात या कलासमीक्षेची जडणघडण झाली आहे. त्यामुळे त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रभाव तिच्यावर पडणं स्वाभाविक होतं. कलेचा कलावादी, जीवनवादी, आस्वादात्मक अशा विविधांगांनी शोध घेण्याचा प्रयत्न होत होता.
या समीक्षेतून एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील आणि विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील महाराष्ट्राच्या कलाविश्वाचं चित्र उभं करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
Thanks for subscribing!
This email has been registered!