शिर्वी ही एक आदिवासी मुलगी.
चंद्रावरून पृथ्वीवर आलेली काही पिटुकली मंडळीं तिच्या घराजवळच उतरतात. त्यांना पोहता येत नसतं. त्यांच्यातला एक अचनक पाण्यात पडतो. त्याला वाचवण्यासाठी सगळे पिटुकले आरडाओरडा करू लागतात. शिर्वी चटकन पुढे होते आणि त्याला वाचवते. मग पुढे तेही तिच्या मदतीला जातात आणि घडते वेगळीच गंमत...
वारली चित्रकलेच्या उगमाच्या या काल्पनिक कथेला, कला विद्यार्थिनी व शिक्षिका असलेल्या उमा कृष्णस्वामी यांनी साजेशी चित्रं काढली आहेत. यातली चित्रं व कथा मुलांसोबत मोठ्यांनाही आवडतील.
Thanks for subscribing!
This email has been registered!