1977-80च्या दशकांत आपल्या आगळ्यावेगळ्या वैज्ञानिक विषयामुळे ‘देवांसि जिवे मारिले’ ही कादंबरी विशेष लक्षणीय ठरली होती. प्रसिद्ध विज्ञानलेखक लक्ष्मण लोंढे आणि चिंतामणी देशमुख या जोडीने ही कादंबरी लिहिली आहे.
माणसाला फार पूर्वीपासून परग्रहावर जीवसृष्टी आहे का, असल्यास यावर मानवजात असेल का, ती आपल्यापेक्षा किती प्रगत असेल असे प्रश्न पडत आलेले आहेत. त्या दिशेने संशोधनात्मक कार्यही अनेक वर्षांपासून सुरू आहे. जर अशा परग्रहावरील प्रगत मानवांशी आपला संपर्क झाला तर!.. हा माणसाच्या कुतूहलाचा विषय ठरला आहे.
याच कल्पनेवर लक्ष्मण लोंढे यांनी ही अप्रतिम कादंबरी बेतली आहे. 1983 साली ही कादंबरी प्रकाशित झाली तेव्हा संगणक, मोबाईलही बाल्यावस्थेत होते. परंतु त्या दृष्टीने प्रयत्न सुरू होते. संगणकाचे एक कल्पनाचित्र लोकांच्या मनात होते. या कादंबरीत त्याचीही मनोज्ञ झलक आपल्याला पाहायला मिळेल.
वैज्ञानिक संकल्पना, कल्पनेची भरारी, पृथ्वीवरील सर्व मानव एकच असल्याचा संदेश, मानवी भावभावनांचा खेळ असा एक मनोरम पट या कादंबरीत वाचायला मिळेल.
Thanks for subscribing!
This email has been registered!