‘डायमंड सामाजिक ज्ञानकोश’ म्हणजे भावी पिढीकडे सोपवलेला वैचारिक वैभवाचा वारसा!’
नवी परिभाषा, संज्ञा, प्रचलित संकल्पना, ताजे संदर्भ, पूर्वसूरींचे कार्य, जुने सिद्धान्त यांचा अपूर्व मेळ!
‘रिमोट सेन्सिंग’, ‘सेक्स एज्युकेशन’, ‘व्ही.आय.पी.’, ‘आयकॉन’, ‘पॉवर इलिट्’, ‘इंडियन रेल्वे’, ‘मॉन्टेसोरी मेथड’, ‘शून्य तास’, ‘आर्कियालॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया’, ‘स्त्रीमुक्ती...’, ‘मार्क्सवाद’, ‘गाझापट्टी’, ‘सार्क’, ‘भारतीय नृत्य’, ‘ग्रँड स्लॅम’, ‘डिजिटल सिनेमा’ अशा नित्य भेटणार्या, इतिहासात हरवलेल्या, भूगोलात, राजकारणात कधी तरी आढळणार्या संज्ञांची नव्यानं ओळख करून देणारं संकलन ह्यात आहे. सामाजिक शास्त्रांच्या मराठी विद्यार्थ्याला, अध्यापकाला, स्पर्धा परीक्षा देणार्याला, जिज्ञासूला हरघडी उपयोगी पडणारा ज्ञानमित्र!
भारतीय तत्त्वज्ञानापासून माहिती तंत्रज्ञानापर्यंत, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मानसशास्त्रापासून वृत्तविद्येपर्यंत, नव्या जुन्या व्यक्तिमत्त्वांचा, सिद्धान्तांचा आलेख... अस्सल मराठीचं देशीकार लेणं शोभावं.
डायमंड सामाजिक ज्ञानकोश....
विराट काळाच्या पटावर उमटलेल्या ज्ञान-विज्ञानाच्या पाऊलखुणा
Thanks for subscribing!
This email has been registered!