तीन पिढ्यांची कहाणी ‘टारफुला’ या कादंबरीत येते. कोल्हापुरात दऱ्याखोऱ्या आणि डोंगरांच्या घळींनी वेढलेलं एक गाव. या गावचा पाटील हृदयक्रिया बंद पडून अकस्मात मरण पावतो. त्याला मूलबाळ नसल्यामुळे पाटलीणबाईंनी आपल्याच मुलाला दत्तक घ्यावे, असे गावातील मातब्बर व्यक्तींना वाटू लागते. पाटलीणबाई भावाच्या लहान मुलाला दत्तक घेण्याचा निर्णय आबा कुलकर्णींना सांगून गाव सोडून भावाकडे राहण्यास जातात. गावावर आता कुणाचाच वचक न राहिल्याने दऱ्याखोऱ्यातील फरारी दरोडेखोर मातब्बर व्यक्तींच्या सांगण्यावरून गावात येऊ लागतात आणि दहशत माजवू लागतात. आबा कुलकर्णींवर पाटलीणबाईंना आपलं मूल दत्तक घेण्याविषयी सांगण्यासाठी दबाव आणू लागतात. पाटलांच्या गरीब कुळांना हटवून त्यांची शेती या व्यक्ती आपल्या ताब्यात घेतात आणि कुलकर्णी ऐकत नाही असे वाटून त्यांचा खून केला जातो.
Thanks for subscribing!
This email has been registered!