झाशी संस्थानच्या महाराणी लक्ष्मीबाई हे भारतीय इतिहासाच्या कालपटलावर अजरामर झालेलं
व्यक्तिमत्त्व ... १८५७ च्या ऐतिहासिक घटनेला ‘बंड’, ‘जिहाद’, ‘स्वातंत्रसमर’
किंवा ‘शिपाईगर्दी’ कुणी काहीही म्हणो. ज्या वीरांनी ब्रिटिशांविरुद्ध झुंज दिली त्यामध्ये या ‘अद्वितीय स्त्रीरत्ना’चे स्थान अव्वल दर्जाचे आहे ...
ज्येष्ठ इतिहास संशोधक रावबहादूर दत्तात्रेय बळवंत पारसनीस यांनी १८९४ साली ‘महाराणी लक्ष्मीबाईसाहेब’ यांचे चरित्र मराठीमध्ये प्रसिद्ध करून प्रापल्याला उपकृत केले ...
१८५७ च्या ऐतिहासिक घटनेला दीडशे वर्ष होऊन गेल्यावर हा ग्रंथ पुनःप्रकाशित होत आहे.
अशा या वीरांगनेला आमचा मानाचा मुजरा
Thanks for subscribing!
This email has been registered!