ही गोष्ट आहे एका जादुई जंगलाची. अचानक या जंगलात एका जादूच्या सशाचं आगमन झालं अन् जंगलात जादूच्या करामती घडू लागल्या. जादूची शाळा, प्राण्यांचा दवाखाना, कोकिळेचे संगीतवर्ग, प्राण्यांची जत्रा अन् अशाच खूप साऱ्या गमती. जंगलाचा सेनापती व्हायला प्रत्येक प्राणी उत्सुक. त्या शर्यतीत छोटा ससा कसा झाला सेनापती? त्यानं कसं केलं प्राण्यांचं, जंगलाचं रक्षण? या सगळ्या गमतीजमतीची रोमहर्षक, मनोरंजक कहाणी.. जादुई जंगल
Thanks for subscribing!
This email has been registered!