माणसं जंगलाकडे ती एक रानटी आणि धोकादायक जागा अशा नजरेने बघतात; पण त्यांना हे माहीत नसतं की जंगलातही अनेक नियम असतात, शिस्त असते... पण ते कळत नसल्यानेच माणसाला जंगलाची भीती वाटते.
मोगली हा माणसाचा मुलगा योगायोगाने जंगलातल्या लांडग्यांच्या कळपात मोठा होतो. बल्लू अस्वल आणि बघीरा हा काळा बिबट्या त्याला जंगलाचे नियम शिकवतात.
पुढे मोगली माणसांच्या सहवासात येतो, पण माणसांचं जग त्याला खोटं आणि असुरक्षित वाटतं. आणि निसर्गातलं आनंदी जीवन जगण्यासाठी तो पुन्हा जंगलात परततो. लहानपणपासूनच आपल्या मागावर असणाऱ्या वाघाला युक्तीने ठार करतो आणि सुखाने जंगलात राहू लागतो.
क्वेन्तँ ग्रेबाँ या जगप्रसिद्ध चित्रकाराच्या चित्रांमुळे हे पुस्तक अधिकच देखणे झाले आहे.
Thanks for subscribing!
This email has been registered!