खारूताईच्या छोट्या पिल्लाचं नाव होतं चिलू. एकदा ते उन्हाळ्यात खेळत होतं. अचानक आकाशात ढग आले आणि पाऊस सुरू झाला. चिलू बाळ खूश झालं. पण पाऊस लगेच थांबला. चिलूला खूप वाईट वाटलं. त्याने हट्ट धरला पाऊस हवाच. ते काही खाईना, पिईना. पण त्याचा हट्ट पुरवला एका हत्तीने! चिलू बाळाची ही मजेदार गोष्ट. याशिवाय इतरही गमतीशीर गोष्टी या पुस्तकात आहेत. गोष्टीला साजेशी अशी रंगीत चित्रं मुलांना आवडतील व त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देतील.
Thanks for subscribing!
This email has been registered!