मराठीच्या पेपरमध्ये आवडता प्राणी म्हणून कुंभाराच्या कौतिकाने गंगाराम गाढवावर निबंध लिहिला. पण सगळ्यांनी तिची टिंगल केली तेव्हा तिच्या डोळ्यांत पाणी आलं. पण बाईंनी मात्र तिचं भर वर्गात कौतुक केलं तेव्हा मात्र तिचा चेहरा आनंदाने उजळला... नकुलने पै पै जमवून आपली पुंजी जमवली असते. त्यासाठी खूप काबाडकष्ट केलेले असतात. पण भूकंपग्रस्तांना मदत म्हणून तो सगळी पुंजी दान करतो तेव्हा मात्र त्याच्या १५-२० रुपयांना लाख रुपयांचं मोल येतं... अशा गोष्टी असलेलं हे पुस्तक चंद्रमोहन कुलकर्णी यांच्या चित्रांनी सजलं आहे.
Thanks for subscribing!
This email has been registered!