कौटुंबिक हिंसाचार म्हटलं की, मनात येते शारीरिक इजा! पण एखाद्या स्त्रीवर शारीरिक आघाताबरोबर इतर प्रकारचाही अत्याचार होत असतो. समाजातल्या सर्व स्तरांमधील स्त्रियांवर घरामध्ये कमीअधिक प्रमाणात दररोज अत्याचार होत असतो.
कौटुंबिक अत्याचार म्हणजे काय, आपण किंवा आपल्याजवळचे कोणी पीडित आहे का? अत्याचार होत असताना मदत कशी मागाल? कायदा काय सांगतो? आणि समाजातील स्त्रियांचा ह्या प्रश्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे? ह्याची सखोल माहिती ह्या पुस्तकात दिली आहे.
व्यवसायाने मार्केट रिसर्च कन्सल्टंट असलेल्या मेधा ताडपत्रीकर ह्यांनी गेली अनेक वर्षे भारतातील व परदेशातील असंख्य पीडित महिलांशी प्रत्यक्ष संवाद साधून, त्यांना बोलते करून ‘कौटुंबिक हिंसाचार’ ह्या विषयाचा सखोल अभ्यास केला आहे.
Thanks for subscribing!
This email has been registered!