'पद्मश्री डॉ. म. के. ढवळीकर. पुरातत्त्वातील अनेक कूटस्थळांचा वेध घेणारे जागतिक कीर्तीचे पुरातत्त्वज्ञ. सहजसोपी लेखनशैली अन् नेटकी मांडणी यामुळे पुरातत्त्वासारखा व्यापक विषय त्यांनी रंजक आणि रुचिपूर्ण बनवला. प्राचीन सिंधू संस्कृती, वैदिक संस्कृती, प्राचीन काळातील पर्यावरण, प्राचीन भारतीय कला, स्थापत्य अन् त्यातून उलगडणारे लोकजीवन, गणेश या दैवताची उत्क्रांती असे विविध विषय त्यांनी अनेक पुस्तकांमधून वाचकांसाठी सुबोध बनवले. इसवीसनपूर्व तिसरे सहस्रक ते इसवीसनपूर्व पहिले सहस्रक या कालखंडात घडलेल्या सांस्कृतिक संक्रमणाच्या विविध पैलूंचा आढावा घेत डॉ. ढवळीकर या पुस्तकात मागोवा घेत आहेत एका आजवर न उलगडलेल्या प्रश्नाचा - कोण होते सिंधू लोक ? '
Thanks for subscribing!
This email has been registered!