खगोलशास्त्र हा विषय खूपच विस्तृत आहे. या क्षेत्रातलं आपलं ज्ञान काही एका रात्रीत मिळवलेलं नाही, तर ते हजारो वर्षांच्या उत्क्रांतीचं फलित आहे. हा व्यापक विषय उदय पाटील यांनी या पुस्तकात मनोरंजक पद्धतीने मांडला आहे. तर सुनीता खरे यांनी सहज सोप्या शैलीत त्याचा अनुवाद केला आहे. हे पुस्तक म्हणजे खगोलशास्त्राची माहिती देणारी चित्रकथा नसून त्याची उत्क्रांती गोष्टीरूपात सांगण्याचा प्रयत्न आहे. जिज्ञासू तसंच या विषयात रस असणार्या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.
Thanks for subscribing!
This email has been registered!