एके दिवशी ईचा नावाची माशी आणि पूचा नावाच्या मांजरीने मिळून तांदळाची चविष्ट कणेरी बनवली. पण कणेरी खायची कशी? त्यांच्याजवळ काही चमचा नव्हता. म्हणून फणसाचं पान शोधायला ईचा भुरकन उडाली. पूचाने कणेरीवर लक्ष ठेवायचं कबूल केलं. तिला फार भूक लागली होती. तिने थोडा वेळ वाट पाहिली. तिला राहवेना. तिने कणेरी खाऊन संपवली. पण तिचं पोट फुगायला लागलं...
Thanks for subscribing!
This email has been registered!