‘आरक्षण’ हा अलीकडे परवलीचा शब्द बनला आहे. पिढ्यान्पिढ्या उपेक्षिलेल्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या समाजास पुढारलेल्या समाजाच्या बरोबरीने आणण्यासाठी विशेष संधी म्हणून आरक्षणाची तरतूद भारतीय संविधानात करण्यात आली. वास्तविक ही तरतूद सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीयांसाठी होती. यातून मागासवर्गीयांना संधी मिळावी आणि त्यांची सर्वांगीण उन्नती व्हावी, हा उदात्त हेतू होता.