घराच्या सुरक्षित सावलीमध्ये आपली लहानगी पहिली पावलं टाकतात, पहिला शब्द उच्चारतात, भोवतालचं चिमुकलं जग लुकलुक डोळ्यांनी आणि इवल्या हातांनी चाचपत जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. मग एक दिवस आपलं बोट धरून ती घराबाहेरच्या मोठ्ठ्या जगात प्रवेश करतात. स्वतःचं स्वतंत्र जग घडवण्याच्या दिशेनं त्यांचा प्रवास सुरू होतो. मुलं शाळेत जायला लागतात. कसं असतं हे शाळेचं जग? थोडीशी भीती, थोडंसं दडपण, खूपशी उत्सुकता... आपल्यासोबत मुलांनाही शाळेत घेऊन जाणारं पुस्तक.
Thanks for subscribing!
This email has been registered!