'Children and Learning Difficulties' या पुस्तकाचे शारदा बर्वे यांनी केलेले मराठी रूपांतर.
शिक्षणाच्या पारंपरिक चौकटीत यशस्वी होऊ न शकलेल्या मुलांना आणि प्रौढांना समाज पटकन दोषी धरतो. मात्र खरी गरज असते ती त्यांच्यातील क्षमतांना असणार्या मर्यादांसह त्यांच्याकडे डोळसपणे पाहण्याची. मानसशास्त्रातील (सायकॉलॉजी- इं.) आणि मज्जामानसशास्त्रातील (न्यूरॉसायकॉलॉजी- इं.) प्रगतीने आपल्याला ‘मानसा’कडे आणि त्यामुळेच ‘माणसा’कडे पाहण्याची एक नवीन दृष्टी बहाल केली आहे. त्यामुळे हे आता शक्य झाले आहे.
लेखन, वाचन व इतर अभ्यास याबाबतच्या शाळेच्या अपेक्षा काही मुले पुर्या करू शकत नाहीत. या मुलांना कोणत्या अडचणी येतात, त्या कशामुळे येतात व आपण त्यांना कशी मदत करू शकतो याचे विस्तृत विवेचन प्रस्तुत पुस्तकात आहे.
‘शिक्षणाचा अधिकार’ सर्वांसाठी लागू झाल्याचे लक्षात घेता या पुस्तकाचे महत्त्व विशेष आहे. अध्ययन-अक्षमता या विषयाचा सखोल परामर्ष घेणारे हे मराठीतील पहिले पुस्तक आहे.
पालक, शिक्षक, शिक्षणक्षेत्रातील पदाधिकारी, मानसशास्त्राचे अभ्यासक, रेमेडियल टीचर्स अशा सर्वांसाठी हे पुस्तक उपयोगी आहे.
Thanks for subscribing!
This email has been registered!