हस्ताक्षर हा माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचा आरसा असतो. प्रयत्नपूर्वक काही गोष्टी केल्यास ते नक्कीच चांगलं येऊ शकतं. या पुस्तकात अ.म.भिडे यांनी हस्ताक्षरकला साध्य करण्यासाठी काही अनुभवसिद्ध मार्ग सुचवले आहेत. मराठी व इंग्रजी अक्षराचे वळण, आकार आणि लेखनपद्धती यांबाबत सोदाहरण मार्गदर्शन या पुस्तकात आहे. चांगल्या हस्ताक्षराचे नमुने दिले आहेत. त्याचप्रमाणे कट निब, पेन्सिल, पेन, बॉलपेन, फाउंटन पेन, स्केच पेन अशा साधनांचा वापर करून काढलेलं हस्ताक्षर कसं असतं यांचेही नमुने दिले आहेत. विद्यार्थी तसंच शिक्षकांसाठी हे पुस्तक मार्गदर्शक आहे.
Thanks for subscribing!
This email has been registered!