कवीच्या तरल मनाचा नितळ आरसा म्हणजे कविता. कल्पनाविष्काराबरोबरच कवितेतून स्व-भोवतालचे सूक्ष्म अवलोकन आणि समाजभान प्रकट होत असते. कवितेच्या रूपाने हे सत्य मला उमगले आणि जगण्याच्या संवेदनक्षमतेतून, जीवनानुभूतीतून माझी कविता आकाराला आली असं संगीता बर्वे म्हणतात.
त्यांच्या निवडक कविता अनंत ताकवले यांनी वाचकांसमोर आणल्या आहेत. मोठ्यांच्या कवितांसोबतच यात बालकविताही घेतलेल्या आहेत.
मुखपृष्ठ व आतील चित्रे मिलिंद मुळीक यांची आहेत.
Thanks for subscribing!
This email has been registered!